औरंगाबाद : छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, पृथ्वीराज पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष विलास उबाळे, सुरेश वाकडे, मनोज गायके आदींची उपस्थिती होती.
छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगपुरा येथून सकाळी दहा वाजता चार चाकी रॅली काढण्यात आली. क्रांती चौक, जालना रोड, सिडको ते टीव्ही सेंटर या मार्गाने मार्गाने ही रॅली काढण्यात आली. युवा सेनेतर्फे काढण्यात आलेल्या या रॅलीत जिल्हा युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश खैरे, शहर युवा अधिकारी मिथुन व्यास, ऋषिकेश जयस्वाल, सचिन वाहुळकर, रमेश भालेराव यांच्यासह युवा सेनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सायंकाळी सहा वाजता मुकुंदवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शिवप्रभुंची शाहिरी गाथा कार्यक्रम होणार आहे. तर अमोल मिटकरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.